--> इयता 10 वी व इयत्ता 12 वी च्या परीक्षेवेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी नियमावली | School Edutech

इयता 10 वी व इयत्ता 12 वी च्या परीक्षेवेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी नियमावली

Get ready for the Exam | दहावी परीक्षेला सज्ज व्हा..महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा

The Board Exam season is the busiest time of the year. Everyone is sweating, trying to finish studying everything in preparation for the Board Exams. Of course, it's very important to do so, but sometimes you need to rest, too. Here are some tips to help you prepare for the board exam, have fun, and take care of yourself, as well in the process.

इयता 10 वी व इयत्ता 12 वी च्या परीक्षेवेळी होणारे
गैरप्रकार रोखण्यासाठी नियमावली


इयता 10 वी व इयत्ता 12 वी च्या परीक्षेवेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी नियमावली

1) विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे.

2) विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर (प्रश्नपत्रिका वाटप करण्याच्या वेळेपर्यंत) म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 10.20 पर्यंत आणि दुपारच्या सत्रामध्ये दुपारी 02.50 पर्यंत परीक्षा कक्षामध्ये हजर राहणे बंधनकारक राहील.

3) विद्यार्थी अपरीहार्य कारणामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होतेवेळी म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 10.30 वा. व दुपारच्या सत्रामध्ये दुपारी 03.00 वाजेपर्यंत आल्यास विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांची तपासणी करुन विद्यार्थ्यांस विभागीय मंडळाच्या मान्यतेने परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात येईल.

5) परीक्षा सुरू झाल्यानंतर म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 10.30 नंतर व दुपार सत्रामध्ये दुपारी 03.00 नंतर कोणत्याही परीस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही.

6) परीक्षा दरम्यान व्हॉट्सॲपद्वारे प्रश्नपत्रिकेचा काही भाग प्रसारित झाल्याचे निदर्शनास आल्याने, प्रश्नपत्रिका फोटो काढून वा अन्य मार्गाने प्रसारित होऊ नये यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांना मोबाईल बाळगण्यास व वापरण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

7) पेपरफुटी व कॉपीचे गैरप्रकार होऊ नये याची खबरदारी घेणेकरीता राज्यातील सर्वच परीक्षाकेंद्रांवर परीक्षा कालावधीमध्ये अधिकचा पोलीस बंदोबस्त पुरविण्याची विनंती मा. गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना केली आहे. यानुसार गृह विभागामार्फत राज्याचे पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्त, मुंबई यांना याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

8) या संदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना जास्तीत जास्त दक्षता पथके कार्यान्वीत करुन परीक्षा केंद्र / उपकेंद्राना वारंवार भेटी देऊन परीक्षा काळात होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी यथोचित कार्यवाही करण्या संदर्भात निर्देश दिले आहेत.

9) परीक्षाकेंद्रावर पेपरफुटी व कॉपीचे गैरप्रकार होऊ नये याची खबरदारी घेणेकरीता राज्यातील सर्वच परीक्षाकेंद्रांवर परीक्षा कालावधीमध्ये अधिकचा पोलीस बंदोबस्त पुरविण्याची विनंती मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना केली आहे. यानुसार गृह विभागामार्फत राज्याचे पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्त, मुंबई यांना याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

10) दिनांक १५ मार्च २०२२ रोजी इ. १० वी मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकाराबाबत दैनिक महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने ऑनलाईन वृत्त प्रकाशित केले आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशी केली असता, जयभद्रा बहुउद्देशिय शिक्षण संस्था, गिरनेर तांडा संचलित, लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, निलजगांव, ता. पैठण जि. औरंगाबाद येथे दि. १५ मार्च, २०२२ रोजी इ. १० वीच्या मराठी विषयाच्या पेपरच्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक, सहशिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवित असल्याचे निदर्शनास आले असून, सदर प्रकरणी शाळेचा मंडळ संकेतांक व मंडळ मान्यता रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.

मंडळ संकेतांक व मंडळ मान्यता रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.

बोर्ड परीक्षेसाठी आवश्यक सर्व फॉर्म उपयोगी पडतील म्हणून मार्गदर्शन हेतू उपलब्ध
Click Here to Dwnload



मार्च-एप्रिल २०२२ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा कालावधीतील घंटेचे नियोजन. Bell Time Table HSC-SSC Board Exam March-April 2022

Click here to Download दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2022

Get ready for the Exam | दहावी परीक्षेला सज्ज व्हा..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा प्रचलित पद्धतीने होणार हे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे.  त्याचबरोबर त्याचे अधिकृत वेळापत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. दहावी तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा  पूर्ण झाल्या आहेत. मंडळाच्या नियोजनानुसार इयत्ता दहावी  परीक्षांची प्रवेशपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आणि आज 11 पर्यंत अर्ज भरणारे विद्यार्थी देखील उद्या परीक्षेला बसू शकतात.  त्यांच्या बैठक क्रमांकाची माहिती आपल्या login मध्ये मिळेल.

आपल्या विद्यालयात किती विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

यावर्षीच्या विशिष्ट परिस्थितीत परीक्षा केंद्रासाठी असणारे विविध निकष शिथिल करून शाळा तिथे केंद्र ही योजना निश्चित झालेली आहे. ज्या ठिकाणी 15 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत त्या शाळेतील विद्यार्थी अन्य केंद्रावर परीक्षेसाठी प्रविष्ट होतील.  परीक्षेच्या प्रत्यक्ष आयोजना संदर्भात आणि त्याच्या पूर्वतयारीबाबत काही मुद्द्यांवर आपण चर्चा करत आहोत.

🟤बैठक व्यवस्था 

आपल्या विद्यालयातील किती विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत यानुसार पंचवीस विद्यार्थ्यांसाठी 1 ब्लॉक यानुसार ब्लॉकची संख्या निश्चित करावी. ब्लॉक निवडताना जास्त क्षेत्रफळ असलेल्या ब्लॉकला प्राधान्य द्यावे. पंचवीस विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करताना वर्गाच्या प्रवेशद्वारासमोरील भिंतीकडेला सात बेंच आणि अन्य जागेत सहा बेंचच्या तीन रांगा अशी व्यवस्था केल्यास ते सोयीचे ठरते. दरवाजा समोरील भिंतीकडेला ब्लॉकचा आरंभीचा क्रमांक येईल. वर्गाच्या दर्शनी भागावर बोर्डाकडून पुरवल्या जाणाऱ्या  स्टीकरवर ब्लॉक क्रमांक आणि त्यातील परीक्षा क्रमांक....  पासून.....  पर्यंत आणि एकूण विद्यार्थी नोंदवावे आणि तो स्टिकर दरवाजाला चिकटवावा. आपल्याकडील ब्लॉकच्या संख्येनुसार पर्यवेक्षक म्हणुन उपलब्ध शिक्षक वर्गाचा वापर करावा.

Zigzag म्हणजे काय समजून घ्या..

Get ready for the Exam | दहावी परीक्षेला सज्ज व्हा..
Zigzag बैठक व्यवस्था


🟤 पर्यवेक्षक नियोजन 

संबंधित विषयाच्या पेपरच्या दिवशी संबंधित विषय शिक्षक नसावा अशी पूर्वीची मार्गदर्शक सूचना आहे ,तिचे शक्य तितके पालन करण्याचा प्रयत्न करावा. अन्य पर्याय नसेल तर मात्र त्यांना पर्यवेक्षण द्यावे लागेल.

🟤 केंद्र संचालक जबाबदारी

15 आणि त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे फॉर्म भरलेल्या प्रत्येक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना उपकेंद्र संचालक ही जबाबदारी पूर्ण करायची आहे.

त्यांच्या कामकाजावर नियंत्रण आणि मार्गदर्शन हे यापूर्वी आपण ज्या मुख्य केंद्राला जोडले होतो तेथील केंद्र संचालक करतील. 

मुख्य केंद्र संचालक हे त्यांच्या केंद्राला जोडलेल्या सर्व शाळांना परीक्षेशी निगडीत स्टेशनरी वितरण करतील.

यामध्ये मुख्य उत्तरपत्रिका,साधी पुरवणी ,आलेख पुरवणी, नकाशा पुरवणी ,आवश्यकतेनुसार सुतळी, दोरा, कार्बन पेपर होलो क्राफ्ट स्टीकर व बारकोड पेजेस, त्याच बरोबर फॉर्म क्रमांक एक व दोन एकत्र आणि फॉर्म क्रमांक तीन तसेच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका हिशोब आणि इतर आवश्यक कागदपत्रे वितरण करतील, ती तपासून ताब्यात घ्यावीत.

🟤 रनर  जबाबदारी

परीक्षेचे कामकाज योग्य पद्धतीने होण्यासाठी सहाय्यक परिरक्षक अर्थात रनर नियुक्ती करण्यात येत आहे . या व्यक्तीने मुख्य केंद्रावरून  परीक्षेच्या दिवशी आवश्यक सीलबंद प्रश्नपत्रिका स्वीकारणे आणि परीक्षेच्या नियोजित वेळेच्या चाळीस मिनिटे अगोदर केंद्रावर पोहोचवणे गरजेचे आहे.  परीक्षा कालावधीत त्याच ठिकाणी थांबून बैठे पथक म्हणून  देखील काम करायचे आहे आणि परीक्षेचे कामकाज पूर्ण झाल्यावर त्याच दिवशी त्वरित उत्तर पत्रिका आणि त्याच्याशी संबंधित फॉर्म मुख्य केंद्रावर जमा करायचे आहेत. याला वेळेचे बंधन देण्यात आलेले आहे. 

सहाय्यक परिरक्षक अर्थात रनर बाबत...

प्रत्येक शाळा महाविद्यालये यांनी या कर्मचार्‍याचे नाव निश्चित करून बोर्डाला कळवले आहे. काही बदल असल्यास मुख्य केंद्राला लेखी कळवा. ही व्यक्ती दिलेल्या वेळेमध्ये सीलबंद प्रश्नपत्रिका मुख्य केंद्रातून स्विकारणे, सूचनेनुसार संबंधीत शाळा महाविद्यालय येथे वेळेत पोहोच करणे , परीक्षा कालावधीत बैठे पथक सदस्य म्हणुन थांबणे आणि प्रत्येक सत्र समाप्त झाल्यावर उत्तर पत्रिका आणि अन्य Forms मुख्य केंद्राला वेळेमध्ये सुपूर्द करणे या जबाबदाऱ्या पार पाडतील. केंद्र संचालक यांनी आपल्या अधिनस्थ उपकेंद्राच्या रनर यांची माहिती संकलन करून रोटेशन पद्धतीने त्यांच्या स्वतःच्या शाळा महाविद्यालये वगळून अन्य ठिकाणी पाठवायचे आहे .. मुख्य केंद्र ते संबंधित उपकेंद्र यातील अंतर याचा अंदाज घेवून प्रवासाला लागणारा वेळ विचारात घेवून त्यानुसार नियोजन करावे.

प्रत्येक शाळेत आपल्या विद्यार्थ्यांची नियोजित बैठक व्यवस्था, अधिकृत वेळापत्रक, कॉपीमुक्त अभियान सूचना, दंडात्मक कारवाईची नोटीस आणि प्रत्येक दिवशी पुढील पेपरचा विषय आणि वेळ दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. यासोबतच बोर्डाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार 40 ते 60 गुणांसाठी स्वतंत्र आणि 70 ते 100  गुणासाठी स्वतंत्र असे घंटेचे वेळापत्रक नियोजन तयार करून त्यानुसार वेळोवेळी त्याची अंमलबजावणी करावी.

परीक्षा केंद्राच्या प्रचलित सूचनेनुसार परीक्षा कामकाजाशी निगडित कर्मचारी आणि परीक्षार्थी विद्यार्थी याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीला शालेय परिसरात येण्यास परवानगी नाही तसेच परीक्षा कामकाजाच्या कालावधीत अन्य वर्गाचे विद्यार्थी देखील शालेय परिसरात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

आपल्याच शाळेत परीक्षा होत असल्याने आपली जबाबदारी वाढलेली आहे विद्यालयाच्या नावलौकिकाला कुठेही कमीपणा येणार नाही अशा प्रकारचे सामूहिक जबाबदारीचे वर्तन सर्व घटकांकडून अपेक्षित आहे.

सर्वांना परीक्षेच्या कामकाजासाठी मनापासून शुभेच्छा 🌷🌷🌷

---महेंद्र गणपुले. राज्य प्रवक्ता मुख्याध्यापक महामंडळ

गैरमार्गांचा वापर करून प्रश्नपत्रिका बाहेर पडणे  

याबाबत  वरीष्ठ स्तरावर अत्यंत गंभीर चर्चा होऊन पुढील सुचना देण्यात येत आहेत.  
✳️ विद्यार्थ्यांकडून कोणत्याही परिस्थितीत मोबाईलचा वापर होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

✳️ ब्लॉकवर पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकाचा मोबाईल परीक्षेपूर्वी मुख्याध्यापक तथा उपकेंद्र संचालक/ केंद्र संचालक यांच्याकडे सुपूर्त करावा.
✳️  मुख्याध्यापक तथा उपकेंद्र संचालक व केंद्र संचालक यांनीही तातडीच्या कामासाठी संपर्क व माहितीच्या देवाणघेवाणीसाठी मोबाईलचा मर्यादित वापर करावा.
 ब्लॉकवर जाताना  त्यांनी आपला मोबाईल कार्यालयातच ठेवावा. 
याबाबत निष्काळजीपणा आढळल्यास गंभीर कारवाई केली जाणार आहे

CATEGORIES






COMMENTS

BLOGGER
नाव

11 वी प्रवेश CET Exam,4,अवांतर,23,आरटीई शाळा प्रवेश - RTE School Admission,2,इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स - Class 10th Important Notes,6,उपक्रम-Activity,22,कला उत्सव,2,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,5,जुनी पेन्शन योजना - Old Pension Scheme,1,दिनविशेष प्रश्नमंजुषा - Special Days Quiz,8,नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf,1,निकाल - Result,21,पंचायत राज,1,पदवीधर मतदार नोंदणी,1,प्रबोधन दूत योजना,1,प्रवेश परीक्षा - Entrance Exam,6,प्रशिक्षण-Training,17,प्रश्नपत्रिका - Question Paper,22,बालभारती-Balbharti,1,मराठी व्याकरण - Marathi Grammar,1,महाराष्ट्र पंचायत राज,1,मूल्यमापन योजना - Evaluation Plan,14,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - YCMOU Admission,4,राष्ट्रीय शिक्षण धोरण - NEP 2020,1,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण,1,वार्षिक नियोजन,10,वेतन-Salary,11,वेळापत्रक - Time Tables,3,व्हायरल व्हिडीओ - Viral Video,1,शाळा पूर्वतयारी - शाळा प्रवेशोत्सव,2,शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका - Scholarship Question Paper,6,शिष्यवृत्ती-Scholarship,28,शिक्षक पर्व - Shikshak Parv,1,शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET,3,शैक्षणिक-Educational,6,सामान्य ज्ञान चाचणी - GK Quiz in Marathi,15,सेतू अभ्यासक्रम - Bridge Course,18,स्पर्धा परीक्षा-Competitive Exams,4,हिन्दी व्याकरण - Hindi Grammar,1,Career,15,CTET - TAIT,2,Easy Result System,16,English Special,11,Fit India Quiz,1,General Knowledge Quiz in Marathi,1,IT General Knowledge Quiz,1,MCQ - बहुपर्यायी टेस्ट,1,MHT CET,2,NMMS Exam,5,Online GK Quiz,1,Online Test - ऑनलाइन चाचणी,5,online test class 10 - 10वी ऑनलाइन टेस्ट,1,Online Updates,4,Panchayat Raj GK,1,Sainik School Entrance Examination AISSEE,2,SCERT-Maharashtra-Pune,5,SSC दहावी - HSC बारावी,12,Teacher Dancing Viral Video,1,
ltr
item
School Edutech: इयता 10 वी व इयत्ता 12 वी च्या परीक्षेवेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी नियमावली
इयता 10 वी व इयत्ता 12 वी च्या परीक्षेवेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी नियमावली
Get ready for the Exam | दहावी परीक्षेला सज्ज व्हा..महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiccv4-cD3i6WW7_Ps8fSQx6DAaILwZEewHVXCYoG11rctpBEGoue7E3KrRYnoB0VANNZUMFEJaJPghIdBP9AK2TUWNBPYe7ZlUF59a68gaxo68CBERcOwEGgNJeiNiflbqaJ21pPWIA-K3HY0VZCBuBCXFLCe51U5KO4JqfU63j_FkvlaFFKlYUbrKVw=w400-h280
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiccv4-cD3i6WW7_Ps8fSQx6DAaILwZEewHVXCYoG11rctpBEGoue7E3KrRYnoB0VANNZUMFEJaJPghIdBP9AK2TUWNBPYe7ZlUF59a68gaxo68CBERcOwEGgNJeiNiflbqaJ21pPWIA-K3HY0VZCBuBCXFLCe51U5KO4JqfU63j_FkvlaFFKlYUbrKVw=s72-w400-c-h280
School Edutech
https://www.schooledutech.in/2022/03/get-ready-for-exam.html
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/2022/03/get-ready-for-exam.html
true
7787126668128977179
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×