-->

5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अधिसूचना | 5th 8th Scholarship Exam 2023 Notification

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अधिसूचना सोबत सविस्तर उपलब्ध करून देण्यात येत आहे. scholarship-examination-shishyvrutti-pariksha

5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अधिसूचना | 5th 8th Scholarship Exam 2023 Notification

5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अधिसूचना 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना

इयत्ता ५ वी

 • पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(PRE UPPER PRIMARY SCHOLARSHIP EXAMINATION) 
 • शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा
 • आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा
 • विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा

इयत्ता ८ वी

 • पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PRE SECONDARY SCHOLARSHIP EXAMINATION)

शासनमान्य शाळांमधून सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ट होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यामधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर दि. १६/११/२०२२ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

उपरोक्त परीक्षा दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

1. शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक - Scholarship Examination Time Table

1.1 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी)

रविवार दि. १२ फेब्रुवारी, २०२३

5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अधिसूचना | 5th 8th Scholarship Exam Notification

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतूनच विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन व शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेशासाठी निकषानुसार व गुणवत्तेनुसार पात्र विद्यार्थ्यांच्या नावांच्या शिफारसी केल्या जातील, तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जातील.

1.२ पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा :- रविवार दि. १२ फेब्रुवारी, २०२३

5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अधिसूचना | 5th 8th Scholarship Exam Notification

1.3 शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक

5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अधिसूचना | 5th 8th Scholarship Exam Notification

२) शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप

 • पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचे असतील.
 • प्रत्येक पेपरसाठी A, B, C, D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.
 • पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) साठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पयाय अचूक असेल परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.

३) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता

 1.  विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे.
 2.  विद्यार्थी शासनमान्य शासकीय / अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयं अर्थसहाय्यित शाळेत इ. ५ वी किवा इ. ८ वी मध्ये शिकत असावा.

४) विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबतचे पात्रता निकष

➤शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा 

१) पुसेगाव, जि. सातारा २) धुळे ३) औरंगाबाद ४) अमरावती ५) केळापूर, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.
 1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा.
 2. शाळा ग्रामीण भागातील असावी.
 3. फक्त मुलगा असावा. (मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही.)
 4. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा, ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील होय हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

➤आदिवासी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा

 1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्याथा असावा.
 2. फक्त मुलगा असावा. (मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही.)
 3. अनुसूचित जमातीतील (एस. टी.) असावा.
 4. शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातील असावा.
 5. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.
ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील होय हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

➤विमुक्त जाती, भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा

वि.जा.भ.ज. विद्यानिकेतन हे कमळेवाडी, पो. शिरुर (दवडे), ता. जि. नांदेड या ठिकाणी आहे. सदर परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.
 1. इयत्ता 5 वो मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा,
 2. आश्रमशाळेतील विद्यार्थी असावा.
 3. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.
ऑनलाइन आवेदनपत्र भरताना "वि.जा.भ.ज. विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील होय हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

५) शिष्यवृत्ती परीक्षेचे माध्यम 

५.१ परीक्षा एकूण सात माध्यमांमध्ये घेतली जाईल. 

 1. मराठी
 2. उर्दू
 3. हिंदी
 4. गुजराती
 5. इंग्रजी
 6. तेलुगु
 7. कन्नड

५.२ उपरोक्त सात माध्यमांशिवाय सेमी माध्यमांचे पुढील सहा पर्याय उपलब्ध आहेत.

 1. मराठी + इंग्रजी
 2. उर्दू + इंग्रजी
 3. हिंदी + इंग्रजी 
 4. गुजराती + इंग्रजी
 5. तेलुगु + इंग्रजी
 6. कन्नड + इंग्रजी

५.३ पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)

साठी ऑनलाईन आवेदनपत्रात सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर १ मधील गणित या विषयाची व पेपर २ मधील बुध्दिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना दक्षता घ्यावी.

६) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा 

६.१ या परीक्षेस प्रविष्ट होणान्या विद्याथ्र्यांचे वय दि. ०१ जून २०२२ रोजी खाली दर्शवलेल्या
तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसावे.

5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अधिसूचना | 5th 8th Scholarship Exam Notification

६-२ आवेदनपत्रात विद्यार्थ्यांची जन्मतारीख चुकीची नोंदविल्याने विद्यार्थी गुणवत्ताधारक असूनही केवळ सदर चुकीमुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो. त्यामुळे मुख्याध्यापकांनी स्वतः शाळेच्या जनरल रजिस्टर / दाखलखारोज रजिस्टरवरून खात्री करुनच जन्मतारीख अचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे.

६.३ चुकीची जन्मतारीख नोंदवून विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरल्यास संबंधित मुख्याध्यापकांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.
६.४ अस्तित्वात नसलेली जन्मतारीख रजिस्टरमध्ये नोंदविलेली असल्यास (उदा. ३१ एप्रिल) ती ऑनलाईन आवेदनपत्रात न नोंदवता योग्य त्या कार्यपध्दतीनुसार दुरुस्त करून त्यानंतरच आवेदनपत्रात नोंदवावी.

६.५ उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असलेल्या कोणत्याही विद्याथ्र्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरल्यास स्क्रीनवर 'विद्यार्थ्याचे वय विहित कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त आहे, तरीही विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ठ होता येईल परंतु त्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.' असा मेसेज दिसेल. अशा विद्यार्थ्याना केवळ परीक्षेस प्रवेश मिळेल परंतु त्या विद्याथ्र्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.

7) शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क

७.१ शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि. १२/१२/२०२१, दि. १५/११/२०१६ व कार्यकारी समिती सभा क्र. २९. दि. १२/०४/२०१८, ठराव क्र. ४७० नुसार दर पुढीलप्रमाणे आहेत.
5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अधिसूचना | 5th 8th Scholarship Exam Notification

७.२ महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या (MSCERT) शाळेतील SC, ST, VJ-A NT-B, INT-C NT-D या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली असून, ही सवलत CBSE, ICSE व इतर अभ्यासक्रमांच्या शाळातील मागासवगीय विद्याथ्यांना लागू नाही.

७.३ सर्व अभ्यासक्रमांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यासाठी सुध्दा परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे.

७.४ उर्वरित SBC, OBC, OPEN या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरावे लागेल.

८) शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क भरण्याची पध्दत

८.1 शाळांसाठी सूचना :- उपरोक्त शुल्कानुसार शाळांनी सर्व विद्यार्थ्यांचे होणारे एकूण शुल्क ऑनलाईन पेमेंट या पर्यायाची निवड करुन इयत्तानिहाय (इ. ५ वी व इ. ८ वी) स्वतंत्रपणे शक्यतो एकाचवेळी भरावे.

८.२ जि. प. सेसफंड / मनपा निधीतून शुल्क भरणाऱ्या शाळांसाठी सूचना :- ज्या जिल्ह्यांमध्ये परीक्षायांच्या शुल्काची रक्कम जिल्हा परिषदेच्या सेसफंड / मनपा निधीमधून भरली जाते, अशा शाळांना सदर सुविधा केवळ नियमित मुदतीपर्यंत म्हणजे दि. १६/१२/२०२२ रोजीपर्यंतच उपलब्ध करुन देण्यात येईल. नियमित मुदतीनंतर आवेदनपत्र भरावयाचे असल्यास संबंधित शाळेला विलंब शुल्कासह शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यानुसार शाळांनी स्वतः विलंबासह शुल्क भरणे आवश्यक राहील.

८.३ जि. प. सेसफंड / मनपा निधीतून शुल्क भरणाऱ्या शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांच्यासाठी सूचना :- ज्या जिल्ह्यांमध्ये सदर परीक्षेच्या शुल्काची रक्कम जिल्हा परिषदेच्या सेसफंड मनपा निधीमधून भरली जाते. त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / प्रशासन अधिकारी यांनी शासन निर्णय दि. ११/११/२०२१ नुसार सन २०२१ - २२ च्या परीक्षेपासून शुल्क वाढ झाली असल्याची बाव जि.प. / मनपाच्या संबंधित समितीच्या निदर्शनास आणावी.

    आपल्या जिल्ह्यातील नियमित शुल्काच्या मुदतीत आवेदनपत्र भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या शुल्काची एकूण रक्कम तात्काळ उपलब्ध करुन घ्यावी व परिषदेच्या खात्यावर इयत्तानिहाय | ऑनलाईन पेमेंटव्दारे दि. १५ जानेवारी, २०२३ रोजी अखेरपर्यंत भरावी. सदर शुल्क भरण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. उपरोक्तनुसार शुल्काचा भरणा विहित मुदतीत न केल्यास सदर शाळेतील विद्याथ्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिली जाणार नाहीत. तसेच जिल्हा परिषद मनपा शाळांना नियमित शुल्काच्या मुदतीनंतरचे (दि. १६/१२/२०२२ नंतरचे) कोणतेही विलंब शुल्क माफ केले जाणार नाही, त्यामुळे आपल्या अधिनस्त सर्व शाळांना नियमित मुदतीत आवेदनपत्र भरण्याच्या लेखी सूचना आपल्या स्तरावरुन देण्यात याव्यात.

९) परीक्षा परिषद शाळा सांकेतांक :-

शैक्षणिक वर्ष सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्ती परीक्षेचे सर्व कामकाज युडायस कोडनुसार करण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षा परिषद शाळा सांकेतांक नोंदविण्याची आवश्यकता नाही.

१०) ग्रामीण, शहरी क्षेत्र निकष :-

१०.१ शासन निर्णय क्र. एफईडी- ४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि. १५/११/२०१६ अन्वये पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखालील सर्व गावे / वस्तीमधील (लोकसंख्या विचारात न घेता) शाळांमध्ये शिकणान्या विद्यार्थ्यांची गणना "ग्रामीण" भागात करण्यात यावी. तसेच नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका परिक्षेत्रातील शाळांची गणना "शहरी" भागात करण्यात यावी. शाळा ज्या क्षेत्रात आहे तेच क्षेत्र ग्राह्य धरण्यात येईल. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी अधिनस्त शाळांच्या क्षेत्राबाबत खात्री करावी.

१०.२ दि. १६/११/२०२२ पासून शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यास सुरूवात होणार असल्याने दि. १५/११/२०२२ या दिनांकास / दिनांकापूर्वी जी स्थिती असेल ती ग्रामीण / शहरी बाबत ग्राहय धरण्यात यावी.

उदा :- एखाद्या गावातील ग्रामपंचायतीचे रूपांतर दि. १५/११/२०२२ या तारखेनंतर नगरपंचायत / नगरपरिषद/नगरपालिका इ. मध्ये झाले असल्यास संबंधित शाळा ग्रामीण क्षेत्रातच ग्राहय धरली जावी.

११) C.B.S.E वI.C.S.E. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणान्या शाळांबाबत :-

    शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि. १५/११/२०१६ नुसार I.C.S.E. आणि C.B.S.E. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणा-या शाळेतील विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होऊ शकतात. सदर अभ्यासक्रमातील गुणानुक्रमे पहिल्या ५० विद्याथ्यांची राज्यस्तरीय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या विद्याथ्र्यांना प्रमाणपत्र दिले जाते. तथापि सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येत नाही.

१२) बाटी शिष्यवृत्ती :-

    मा. महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या कार्यालयामार्फत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याना सन २०१४ पासून देण्यात येते.

    त्यानुसार इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेतील कट ऑफ लिस्टच्या खालील पात्र विद्याथ्र्यांपैकी शिष्यवृत्ती न मिळालेल्या अनुसूचित जाती या संवर्गातील विद्याथ्यांची यादी पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी मा. महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्याकडे मागणीनुसार पाठविण्यात येते.

१३) ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सर्वसाधारण सूचना :-

 1. पूर्व उच्च प्राथमिक / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस बसण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे शाळेने ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाची आहेत. ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.
 2. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि शासकीय, आदिवासी, विजाभज विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेसाठी एकत्रित एकच आवेदनपत्र आहे. त्यात इच्छुक विद्याथ्र्यांना विद्यानिकेतन प्रवेशासाठी पात्रतेनुसार विकल्प उपलब्ध आहेत.
 3. विद्यार्थ्याच्या ऑनलाईन आवेदनपत्रात भरलेल्या माहितीची पडताळणी / खात्री मुख्याध्यापकानी स्वतः करावी. याबाबत भविष्यात काही प्रश्न उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकाची राहील.
 4. विद्याथ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रांची प्रिंट परीक्षा परिषदेकडे पाठविण्याची आवश्यकता नाही. परीक्षेस बसणान्या विद्यार्थ्यांची यादी, ऑनलाईन आवेदनपत्रांची प्रिंट आवश्यक प्रमाणपत्रे व शुल्क भरलेल्या ऑनलाईन पेमेंटची रिसिट इत्यादी कागदपत्रे संबंधित शाळेच्या मुख्याख्यापकांनी आपल्या दप्तरी जतन करून ठेवावीत.
 5. ऑनलाईन आवेदनपत्रासाठी विद्यार्थ्याचा फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य राहील.
 6. विदर्भातील ११ जिल्हयातील पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.२०,०००/- पेक्षा कमी असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकान्याचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
 7. विद्यार्थ्याचे पालक रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत व रू.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम प्राधिकारी (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) यांनी दिलेली प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे.
 8. मुद्दा क्रमांक ६ व ७ मधील प्रमाणपत्रांची संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावरुन तपासणी करणे बंधनकारक असून सदर प्रमाणपत्र आपल्या दप्तरी जतन करुन ठेवावे व परिषदेने मागणी केल्यास उपलब्ध करून द्यावेत.
 9. ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यापूर्वी आवेदनपत्र भरण्याबाबतच्या मुरेनिहाय सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. त्यानंतरच ऑनलाईन आवेदनपत्रे भरावीत.
 10. संगणकाची व इंटरनेटची पुरेशी माहिती असलेल्या कर्मचान्यांची / व्यक्तीची ऑनलाइन आवेदनपत्रे भरण्यासाठी मदत घ्यावी.
 11. शाळेमध्ये इंटरनेट कनेक्शन नसल्यास अन्य ठिकाणाहून (इंटरनेट कनेक्शन उपलब्अध असलेल्या शाळा, नेट कॅफे इ.) आवेदनपत्रे भरावीत.
 12. नेट कॅफेमधून ऑनलाईन आवेदनपत्र भरल्यास मुख्याध्यापकाने शाळेच्या लॉगीनमधून भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करुनच सबमीट करावे. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क भरले गेल्याची खात्री स्वतः मुख्याध्यापकांनी करावी. यासंबंधी भविष्यात काही प्रश्न उदभवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील.
 13. परीक्षा परिषदेने आवेदनपत्रे भरण्यासाठी कोणत्याही केंद्रास परवानगी दिलेली नाही अथवा प्राधिकृतही केलेले नाही. शाळेने आपल्या सोयीनुसार इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असलेल्या ठिकाणी ऑनलाईन आवेदनपत्रे भरावीत.
 14. ऑनलाईन आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या अधिकृत संकेतस्थळावरुनच भरावीत.
 15. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यापूर्वी आवेदनपत्र भरण्यास इच्छुक असलेल्या विद्याथ्र्यांच्या पालकांना आवेदनपत्रातील सर्व मुद्दयांबाबत सविस्तर माहिती देऊन अवगत करावे.
 16. आवेदनपत्र भरण्यासाठी वेगवान इंटरनेट (Broadband) कनेक्शनचा उपयोग करावा.
 17. आवेदनपत्र भरण्यासाठी शक्यतो गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स ७५ व त्यावरील व्हर्जनच्या इंटरनेट ब्राऊजरचाच वापर करावा. जेणेकरून आवेदनपत्र भरताना कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवणार नाही.
 18.  आवेदनपत्रे भरण्यासाठी शाळांना अकरा अंकी UDISE कोड क्रमांक असणे अनिवार्य आहे.
 19. आवेदनपत्रातील सर्व मुद्दयांची माहिती शाळेच्या रेकॉर्डप्रमाणे अचूक असणे आवश्यक आहे. ऑनलाईन आवेदनपत्रात अचूक माहिती भरणे ही संबंधित मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे.
 20. आवेदनपत्रातील सर्व अनिवार्य मुद्दयांची (Mandatory Field) माहिती भरल्याशिवाय ऑनलाईन आवेदनपत्र SAVE होणार नाही.
 21. Login Id व Password जतन करून ठेवावेत. ते त्रयस्थ व्यक्तीला देऊ नयेत.
 22. विद्यार्थ्याचे आवेदनपत्र भरण्यासाठी आधार कार्ड क्रमांक व बैंक खाते क्रमांक असणे अनिवार्य नाही, मात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाल्यास त्याचे बँक खाते काढून त्याची माहिती ऑनलाईन शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये भरण्याची जबाबदारी संबंधीत शाळा मुख्याध्यापकांची राहील.

१४) शिष्यवृत्ती परीक्षा आयोजनाबाबत सर्वसाधारण माहिती

 1. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सीलबंद स्वरुपात देण्यात येतील.
 2. उत्तरपत्रिकांची तपासणी OMR पध्दतीने केली जाते.
 3. कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येत असल्याने सदर उत्तरपत्रिकांची डिजिटल स्कॅन कॉपी (छायाप्रत) देण्यात येणार नाही.
 4. उत्तरपत्रिकेत गिरवलेली / खाडाखोड केलेली उत्तरे ग्राहय धरली जाणार नाहीत. एकदा नोंदविलेले उत्तर बदलता येणार नाही.
 5. कोणत्याही परिस्थितीत उत्तरपत्रिकेतील वर्तुळ पेन्सिलने रंगवू नये. अशा उत्तरांना शून्य गुण दिले जातील.
 6.  शिष्यवृत्ती परीक्षेची परीक्षापूर्व कामे, उत्तरपत्रिकांची तपासणी, शिष्यवृत्तीधारकांची निश्चिती, विद्यानिकेतन प्रवेश निवड याद्या, विद्याथ्र्यांच्या गुणपत्रिका / प्रमाणपत्रे व परीक्षेची सर्व सांख्यिकीय माहिती संगणकावर तयार केली जाते.

१५) शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना अनिवार्य बाबी / कागदपत्रे खालीलप्रमाणे 

1. विद्यार्थ्याची फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कंन कॉपी (jpg/jpeg/png/bmp format मध्ये 100 kb पेक्षा जास्त नसावी.)

उदा.

२. विदर्भातील ११ जिल्हयातील पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.२०,०००/- पेक्षा कमी असल्यास सक्षम प्राधिकान्याचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र. (इ. ५ वी व इ. ८ वी साठी) 

३. विद्यार्थ्याचे पालक रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर व रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम अधिकारी (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) यांनी दिलेली प्रमाणपत्रे. (इ. ८ वी साठी)

4. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कैन कॉपी.

१६) विद्यार्थ्याचे आधार कार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांकाबाबत

    ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्याथ्र्यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, IFS Code व बैंक खाते क्रमांक) आणि विद्यार्थ्याचा आधार क्रमांक किंवा आधार एनरॉलमेंट क्रमांक उपलब्ध असल्यास नमूद करावा. परंतु सदर बाबी अनिवार्य नसल्याने बँक खात्याचा तपशील किंवा आधार क्रमांकासाठी विद्यार्थी / पालकांवर सक्ती करण्यात येऊ नये. केवळ सदर माहिती उपलब्ध नाही म्हणून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ च्या कामकाजाबाबतची माहिती वरीलप्रमाणे असून त्यात होणारे बदल वेळोवेळी कळविले जातील. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

    सदर अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पुढील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत
आहे. www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in

 माहितीसाठी सविनय सादर

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >