महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड mahahsscboard.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.
बारावीचा निकाल 3 ते 4 जून ला लागण्याची शक्यता तर दहावी चा निकाल 10 जून पर्यंत लागणार
दहावी-बारावीच्या निकालाची तयारी आता युद्धपातळीवर सुरु असून ९० टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. MAHARASHTRA BOARD RESULT 2023, HSC RESULT 2023, SSC RESULT 2023 पहिल्यांदा बारावीचा निकाल ३ ते ४ जून रोजी जाहीर होईल. तर दहावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने बोर्डाकडून नियोजन सुरु आहे.
पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली. परीक्षेनंतर शिक्षकांनी दिलेल्या मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे.सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी झाल्यावर MAHARASHTRA BOARD RESULT 2023, HSC RESULT 2023, SSC RESULT 2023 आता निकालाची तयारी सुरु झाली आहे. बोर्डाकडून निकालाच्या दृष्टीने आवश्यक ९० टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दहावी-बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी विलंब होणार नाही, याची खबरदारी बोर्डाकडून घेतली जात आहे. त्याअनुषंगाने निकाल वेळेत लागावेत, असे नियोजनही बोर्डाने केले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.
मे अखेरीस निकाल जाहीर न झाल्यास ३ ते ४ जूनपर्यंत तो निकाल लागेल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर सहा ते आठ दिवसांत म्हणजेच १० जूनपर्यंत दहावीचा निकाल लागावा, अशीही तयारी झाली आहे.
