१२ वी बोर्ड परीक्षा निकाल Online MAHA HSC Board Exam Result 2022 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२वी | HSC) निकाल 2022 महाराष्ट्र 12th HSC result
ssc-hsc-online-result-maharashtra-2022
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२वी | HSC) निकाल 2022 | महाराष्ट्र 12th HSC result 2022 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे
![]() |
१२ वी बोर्ड परीक्षा निकाल Online MAHA HSC Board Exam Result 2022 |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर बुधवार दिनांक ०८/०६/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१२ वी बोर्ड परीक्षा निकाल | Online MAHA HSC Board Exam Result 2022 अधिकृत संकेतस्थळ
- ■ www.mahresult.nic.in
- ■ www.hscresult.mkcl.org
- ■ https://hsc.mahresults.org.in
- ■ https://lokmat.news18.com
- ■ https://www.indiatoday.in/education-today/results
- ■ https://mh12.abpmajha.com
- ■ https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२२ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (Online Print) काढता येईल...
www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
१२ वी बोर्ड परीक्षा निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे
- ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी ( श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार, दिनांक १०/०६/२०२२ ते सोमवार, दिनांक २०/०६/२०२२ पर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार, दिनांक १०/०६/२०२२ ते बुधवार, दिनांक २९/०६/२०२२ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card / UPI Net Banking) याद्वारे भरता येईल.
- मार्च - एप्रिल २०२२ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे • पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
- मार्च - एप्रिल २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
- जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक १०/६/२०२२ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
- मार्च - एप्रिल २०२२ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (३१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शुक्रवार दि. १७/६/२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता वितरित करण्यात येतील.
संदर्भ- दिनांक: ०७/०६/२०२२, प्रकटन -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४. विषय: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२ वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ च्या निकालाबाबत,
- Telegram - School Edutech Telegram
![]() |
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु Std. 11th Centralized Online Admission Process 2022-23 |
![]() |
The Ultimate Career Solution |
विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी अधिक महत्वाचे-
- आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तरुणांच्या मनांचे संवर्धन याविषयावर विद्यार्थ्यासाठी आयोजित वेबिनार.
- वेबिनार - उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी (STEM)
- The Ultimate Career Solution
- इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार
- विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students
- After HSC
COMMENTS